भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका लग्न समारंभात चर्चा झाली.त्यावर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली.चंद्रकांत पाटील आमचे सर्वांचे चांगले मित्र असं राऊत म्हणालेत.भाजपमध्ये नवीन बाहेरुन आलेले हवसे-नवसे लोकांना शिवसेना-भाजप युतीचे महत्व माहीत नाही.आम्ही एकत्र 25 वर्ष चांगले काम केले असंही राऊत म्हणालेत.तर लग्न सोहळ्यात, चांगल्या कार्यक्रमात, उत्सवात एकमेकांशी भेटले तर संवाद होतोच ही वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई मानू नये असं वडेट्टीवार म्हणालेत.