विधानसभा निवडणुकानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.विधानसभा निवडणुकीतल्या निकालावर राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला.4 ते 5 जागा येतील असं वाटत असताना अजित पवारांना 42 जागा मिळाल्या कशा असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.राजू पाटलांना त्यांच्या गावात एकही मत कसं मिळालं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर शंका उपस्थित केली.याशिवाय निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा होता असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला. जनतेनं मत दिलं पण ती मतं मधल्यामध्ये गायब झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला..