अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे... दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती...मात्र या बैठकीला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती... त्याचबरोबर राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही घेतला आहे...दरम्यान मी राम शिंदे यांच्याशी बोललो असून त्यांची कुठलीही नाराजी नाही, असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.