महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात आणि सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय.. पुण्याच्या शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू झाले असून, आमदार रोहित पवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी पोहोचत विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरच ठिय्या मांडला. बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची चर्चा झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली होती. मात्र आज पु्न्हा एकदा रोहित पवारांसोबत विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं.. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्येही दोन पडले का? अशा प्रश्न उपस्थित झालाय.. दरम्यान पुण्यात रोहित पवारांनी विद्यार्थ्यांसोबत काय संवाद साधला होता पाहुयात.