केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी कायद्याबाबत मोठी घोषणा केली आहे... 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू केला जाणार असून NDA शासित 21 राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होईल, असे अमित शाह यांनी सांगितले... याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली... या अभियानांतर्गत देशभरात 12 विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून सेवा आणि जनसंपर्कावर विशेष भर दिला जाणार आहे.
Amit Shah makes a major announcement regarding the Uniform Civil Code; what other information did he share during his Mumbai visit?