18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. ही भेट ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली. सर्वांनी एकत्र नाश्ता केला. काँग्रेस आणि पंतप्रधान इब्राहिम यांनी ट्विटरवर फोटोही शेअर केले आहेत. "आज सकाळी नाश्त्यावेळी माझे चांगले मित्र राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. आम्ही अलीकडील आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर आमचे विचार मांडले." असं ट्विट इब्राहिम यांनी भेटीनंतर केलंय.. दरम्यान 2019 मध्येही अन्वर इब्राहिम यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती.
Global News | Malaysian Prime Minister meets Rahul Gandhi; the two hold a 'breakfast discussion'.