मुंबईतील रस्त्यांवरून बेधडक धावणाऱ्या ओव्हरलोड डंपरांच्या प्रश्नावरून मराठी कामगार सेनेने प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केले आहेत... आरटीओचे उडते पथक ऐनवेळी गायब राहत असल्याने ओव्हरलोड वाहतुकीला खतपाणी मिळत असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे... आरटीओ अधिकारी आणि एजंट्सच्या संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नसल्याचा आरोप करत मराठी कामगार सेनेने प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली आहे... ओव्हरलोड डंपरमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असताना संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे... या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Mumbai | Is the administration turning a blind eye to deadly overloaded transport? Serious allegations of collusion between the RTO and agents.