केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर होते.. मात्र शाहांच्या दौऱ्यात जलवा पाहायला मिळाला तो अजित पवारांचा.. शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अमित शाहांच्या साई दर्शनानंतर सर्व नेते मंदिराबाहेर पडले. त्यावेळी उपस्थित भाविकांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच संधी असल्याचं हेरत अजित पवारांनीही धावत धावत जात लोकांशी हँडशेक केला.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी दादांच्या बदललेल्या रुपाचा प्रत्यय आला.. तर दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे साई मंदिरात ध्यानात मग्न असलेल्या दिसल्या... तेव्हा अमित शाहांच्या दौऱ्यात दोन नेत्यांची दोन रुपं पाहायला मिळाली..