ग्रेट ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा भारतीयांवरून वादाला सुरुवात झाली आहे. लंडनमधील प्रसिद्ध थेम्स नदीमध्ये एका भारतीय व्यक्तीनं पाय धुतले. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मतमतांतरं व्यक्त होत आहेत. इतकंच नाही तर त्यानं नदीत अंघोळ करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होतोय. गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनमध्ये स्थायिक परदेशी नागरिकांविरोधात वातावरण तापलंय. त्यातच भारतीयांवर तिथं हल्लेही होत असतात. अशात या प्रसंगानं तिथलं वातावरण अधिक कलुषित झालंय