बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अखेर सोमवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकऱणानं दोषी मानत सोमवारी दोन आरोपांवर मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. शेख हसीना यांच्या या निकालापूर्वीच बांगलादेशमध्ये वातावरण अधिक तापलंय. त्यांची पार्टी आवामी लीगनं देशभरात हिंसक आंदोलनं केली. तरीही त्यानंतर शेख हसीना यांच्याविरोधात निकाल सुनावण्यात आला. आता शेख हसीना यांच्यासमोर काय पर्याय आहेत, त्यांना आश्रय देणाऱ्या भारताची आता भूमिका काय असेल. या सुनावणीदरम्यान कोणकोणत्या पुराव्यांच्या आधारे त्यांना दोषी मानण्यात आलं. पाहूया एक सविस्तर रिपोर्ट....