गँगस्टर Tiger Memon च्या दुकानाचा लिलाव, 2 कोटी 5 लाखांना विकलं गेलं दुकान; याचाच घेतलेला आढावा

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर टायगर मेमन याच्याशी संबंधित मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबईतील त्याच्या दुकानाचा तब्बल 2 कोटी 5 लाख रुपयांना लिलाव करण्यात आला. 1993 च्या दंगलीदरम्यान हे दुकान जाळण्यात आले होते. त्याचा बदला घेण्यासाठीच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचा आरोप टायगर मेमनवर आहे. टाडा न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेल्या तीन मालमत्तांपैकी या दुकानाचा लिलाव करण्यात आला असून, या घडामोडीमुळे पुन्हा एकदा 1993 बॉम्बस्फोट प्रकरण चर्चेत आले आहे.

संबंधित व्हिडीओ