नीट परीक्षेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची सूचना लोकसभेत केली आहे. नीट परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेण्याऐवजी ती वर्षभरात अनेकदा घेतली जावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळाल्यास एका परीक्षेवरील दबाव कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेसह काही देशांमध्ये अशा प्रकारे वर्षातून अनेक वेळा परीक्षा घेतल्या जातात, त्याचा विचार भारतातही होणे आवश्यक असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.