नाशिकमध्ये आधी पाऊस पडत नव्हता म्हणून नाशिककर चिंतेत होते... आता पाऊस पडतोय आणि त्या पावसानं नाशिककरांची चिंता आणखी वाढवलीय... कारण शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. चार-पाच दिवसांच्या पावसानेच नाशिकच्या बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की वाहन चालवणं म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखं झालंय. नाशिक शहराची कशी वाट लागली आहे यावर बघूयात NDTV मराठीचा स्पेशल रिपोर्ट.