उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर,अनेकांचे संसार उघड्यावर; अनेक ठिकाणी पूरस्थिती| याचसंदर्भातले अपडेट

तर भारतात विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पावसानं कहर केलाय.जुलै अखेर आलेल्या या पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः हिमाचल प्रदेशात चंबा इथं सोमावारी रात्री जोरदार पाऊस बरसला त्यामुळे सरोल परिसरासह अनेक भागात अचानक पूर आला. घोल्टी गावाला याचा सर्वाधिक फटका बसला.अनेक घरं, दुकानांमध्ये माती-दगडांचे ढिगारेच वाहून आले. यात नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्यासह सुमारे १० वाहनांचं नुकसान झालंय.अनेक घरांच्या तर पहिल्या मजल्यापर्यंत गाळाचे ढिगारे साचले.

संबंधित व्हिडीओ