वसई पूर्वेतील सातिवली भोयदापाडा येथे अंडा भुर्जीचा ठेला चालवणाऱ्या मोहम्मद सैर्फुल शेख या फेरीवाल्याला हप्ता न दिल्याच्या कारणावरून एका पोलिसाने भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.. धंदा सुरू ठेवण्यासाठी अगोदर 15 हजार रुपये आणि दरमहा 3 हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करण्यात येत होती, असा आरोप करण्यात आला... दरम्यान, स्थानिक नागरिकांनी संबंधित पोलिसावर कठोर कारवाईची मागणी केली आहे...