Jalgoan| विवाह होत नसल्याने 29 तरुणांनी जीवन संपवलं, एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर वडील एकाकी

जळगाव जिल्ह्यातील गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीने एक अस्वस्थ करणारे वास्तव समोर आणले आहे.विवाह जमत नसल्याच्या नैराश्यातून तब्बल २९ तरुणांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. समाजातील वाढत्या अपेक्षा, जोडीदार निवडताना लावले जाणारे निकष आणि सतत होणारी नकारात्मकता.या सगळ्यांचा मानसिक ताण किती भयंकर असू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे जळगावातील कौस्तुभ सतीश पोतदार. चांगली नोकरी, स्वतःचे घर, स्थिर उत्पन्न... सर्व काही असूनही विवाह होत नसल्याने आणि आईच्या निधनानंतर आलेल्या एकटेपणामुळे कौस्तुभ नैराश्यात गेला आणि त्याने वयाच्या 28व्या वर्षी आयुष्य संपवले.

संबंधित व्हिडीओ