नागपुरात दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक भागांत जलसाच्याची समस्या कायम आहे. विशेषतः स्वावलंबी नगर परिसरातील इनर रिंग रोडवर रात्री आठ वाजेपर्यंतही पाण्याचा निचरा झालेला नाही. दुपारी दोनच्या सुमारास पाऊस कमी झाला असला तरी तब्बल सहा तास उलटल्यानंतरही रस्त्यावर पाणी तुंबून असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. परिस्थिती लक्षात घेता इनर रिंग रोडवरील काही भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी...