बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची अनोखी झलक पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बैठकीसाठी विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये दाखल झाले असता एका रोबोटने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शरद पवार चला म्हणताच रोबोट बाजूला सरला आणि शरद पवार बैठकीसाठी मार्गस्थ झाले.