Uttar Pradesh तील 100 आमदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता, वि.निवडणुकीसाठी BJP ची कडक भूमिका

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच अत्यंत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पक्षांतर्गत असणारी गटबाजी आणि तिकीट वाटपावरून नेत्यांमधील वाद यावेळी अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडून उत्तर प्रदेशातील सर्व नेत्यांना देण्यात आला आहे. यापूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला होता. 2019 साली 80 पैकी 62 जागा जिंकणाऱ्या भाजपला 2024 मध्ये केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले होते. तिकीट वाटपावरून निर्माण झालेले मतभेद याला कारणीभूत असल्याचं निदर्शनास आल्याने पक्षाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 100 MLAs from Uttar Pradesh likely to be denied tickets; BJP adopts a tough stance for the Assembly elections.

संबंधित व्हिडीओ