सायबर भामट्यांपासून सावधान फोन वरच्या धमकीला घाबरू नका. उगाच पैसे भरू नका डिजिटल अरेस्ट करून घेऊ नका. हे सगळं तुम्हाला पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे पुण्यात एका इट इंजिनिअर ला सहा कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाल्याची धमकी देऊन त्याच्याकडून सहा कोटी एकोणतीस लाख लुटण्यात आले. पुण्यामध्ये पाषाणमध्ये राहणाऱ्या इट इंजिनिअर ला एक फोन आला. तुमच्यावर मनी लॉड्रिंग चा गुन्हा दाखल आहे.