चिपळूणच्या खडपोली नदीपात्रात अडकलेल्या तिघांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली.चढणीचे मासे पकडण्यासाठी तिघे नदीपात्रात उतरले होते.संतोष पवार, त्यांची पत्नी आणि पुतण्या ओंकार पवार हे तिघे पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकले.मुसळधार पावसामुळे अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली.यावेळी नदीवरील एका बेटावर तिघे अडकून पडले. अखेर रात्री उशिरा चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने बचावकार्य सुरु केले. रात्री उशिरा 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले.