CM Devendra Fadnavis आणि Sharad Pawar आज एका व्यासपीठावर, काय आहे एकत्र येण्याचं कारण? जाणून घ्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज एका व्यासपीठावर येणार आहेत.राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' या विषयावरील परिसंवादात दोन्ही नेते आपली सहकाराबाबतची भूमिका मांडणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी,राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ