जळगाव रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक बेवारस कार आढळलेली आहे. या कार मधून बीप चा आवाज येत होता आणि त्यामुळे तिथल्या प्रवाशांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेवारस कार आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेली असून घटनास्थळी बॉम्ब शोध पथक दाखल झाले.