उद्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल. दुपारी एक वाजता संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार आहे.