युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या मालेगावमध्ये यंत्रमाग उद्योगावर मोठा परिणाम झालाय. मालेगावात यंत्रमागावरती तयार झालेल्या कच्च्या कापडावर राजस्थान सीमावर्ती बालोतरा, बाडमेरा इथे प्रक्रिया केली जाते. मात्र सध्या भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे बाडमेरा भागात ब्लॅकआउट असल्यानं तिथल्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊन मध्ये पाठवलेला माल मोठ्या प्रमाणात तसाच पडू नये. त्यामुळे मालेगाव मधनं रोज शंभर ट्रक मधनं जाणाऱ्या कापडाच्या गाठीवरती त्याचा परिणाम झालाय. तिथल्या गोडाऊन मधनं व्यापाऱ्यांनी आपला माल परत घेऊन जावा असं कळवण्यात आलंय. त्यामुळे त्याचा परिणाम मालेगावच्या कपडा व्यापारावरती सुद्धा होतोय.