Hingoli च्या औंढा, वसमत ते नांदेड मार्गावर भेगा; दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या रस्त्याची दुरावस्था

हिंगोलीच्या औंढा, वसमत ते नांदेड राज्य मार्गावरील सिमेंट रस्त्यावर दोन वर्षातच मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून दुचाकीचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. या भेगांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे..यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी...

संबंधित व्हिडीओ