काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यानंतर आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. आज नाशिक आणि नागपुरात राष्ट्रवादीचं काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन झालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.या सोबतच त्यांनी सुनेत्रा पवारांची माफी मागावी अशी आमदार सरोज आहिरे यांची मागणी तर दुसरीकडे सपकाळ साहेबांनी कोणतीही चुकीची पोस्ट केली नव्हती.नापास विद्यार्थ्याला पास कसं म्हणायचं ? अशी प्रतिक्रिया नाशिकचे काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू खैरे यांनी दिलीय.