होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलाय. 30 जून रोजी कौन्सिलने एक अधिसूचना जारी केली होती. यात होमिओपॅथी डॉक्टरांना 6 महिन्यांचा कोर्स केल्यानंतर आधुनिक औषधे लिहून देण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा झाली मात्र तोडगा न निघाल्याने संप पुकारण्यात आला आहे. आज ओपीडी बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल होणार आहेत.दरम्यान संपासंदर्भात आमचे प्रतिनिधी संजय तिवारींनी आढावा घेतलाय पाहुयात.