Siddhivinayak Temple मधील कथित घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, Eknath Shinde यांनी काय दिले आदेश?

सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या पाच वर्षांत प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे दिले आदेश.अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना अहवाल तयार करण्याचे दिले आदेश.मंदिरात आलेल्या देणग्यांची नोंद, आर्थिक व्यवहार, दागिन्यांचा हिशेब आणि त्यांच्या व्यवस्थापनाची सखोल तपासणी या ऑडिटद्वारे केली जाणार आहे.या लेखापरीक्षणाचा अहवाल आल्यानंतर संबंधित बाबींवर पुढील निर्णय घेतला जाणार असून, अनियमितता आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती.काल मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी घेतली होती एकनाथ शिंदे यांची भेट.

संबंधित व्हिडीओ