एकीकडे मनपामध्ये वाहनांसाठी उधळपट्टीवरुन वाद रंगलाय... तर महापौर बंगल्याच्या सुधारणेसाठी एप्रिल २०२६ मध्ये ३.४० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही याच बंगल्यात सोयी-सुविधांसाठी आणखी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.. बंगल्याच्या बाहेरील जागेत विविध सोयी-सुविधा देण्याकरीता पालिका प्रशासनाने २.८९ कोटींच्या निविदा मागवल्या आहेत.