Nagpur Crime| इन्स्टाग्रामवर जुळलं आणि 24 तास लैंगिक छळ,16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मित्राची मारहाण

ठाण्यातील गर्भश्रीमंत कुटुंबातील तरुणाने हादरवून सोडणारे कृत्य केले आहे. सोशल मीडियावरील मैत्रीचा फायदा घेत एका तरुणीवर विकृत लैंगिक अत्याचार व बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मुलाने या अल्पवयीन मुलीचे हात बांधून, शरीरावर चाकूने वार करत आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर विकृत लैंगिक अत्याचार केले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उच्चभ्रू कुटुंबातील आहे. तिचे वडील शासकीय यंत्रणेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. 4 वर्षांपूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिची ओळख ठाण्यातल्या 19 वर्षाच्या तरुणाशी झाली होती. आरोपीने 'आकाश मेहरा' या खोट्या नावाने तिच्याशी इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू केली. तीचा विश्वास संपादन केला. मात्र हाच विश्वास तीला महागात पडला..

संबंधित व्हिडीओ