नाशिक शहरात सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जणू एकमेकांशी स्पर्धाच रंगलेली पाहायला मिळत आहे. या जीवघेण्या स्पर्धेत नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील खड्ड्यांचा पहिला क्रमांक लागण्याची दाट शक्यता निर्माण झालीय.संपूर्ण शहरात कुठेही आढळणार नाहीत, एवढे प्रचंड आणि मोठे खड्डे या औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यांवर पसरलेत.या परिसरातून महिन्याला तब्बल ७ ते ८ हजार कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक उलाढाल होते. आर्थिक उत्पन्नात एकट्या अंबड MIDC चा वाटा तब्बल ४३ टक्के इतका मोठा आहे. नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असूनही या भागातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत.दरम्यान अंबड MIDC परिसरातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी