राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे. अशातच आता हवामान विभागाने (IMD) पुन्हा नवा इशारा देत राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे.