दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होतंय. दिल्लीत काँग्रेस भाजप आणि आपमध्ये चुरशीची लढाई आहे. आज सर्व सत्तर जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान चालेल. दिल्लीत सत्तांतर होणार की सत्ता टिकवण्यात आप पक्षाला यश येणार याचा निर्णय मतदार आता मतदान करून जनता देणार आहे. दिल्लीतील एक कोटी छप्पन्न लाख चौदा हजार मतदार भाजप आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांसह एकूण सहाशे नव्व्याण्णव उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे.