माणुसकीला काळिमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या आईनेच आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाची केवळ दहा हजार रुपयांना विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही विक्री १०० रुपयांच्या बॉण्डवर 'दत्तक करार' दाखवून करण्यात आली. या प्रकरणी मुलाच्या आजीनेच फिर्याद दिली आहे.