काँग्रेस मुक्त भारत करणारी भाजप इकडे महाराष्ट्रात काँग्रेसयुक्त भाजप होण्याच्या वाटेवर आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले नेते कमी होते म्हणून की काय? आता काँग्रेस फोडण्याचे आदेशच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेत. आता प्रदेशाध्यक्षांनी जाहीरपणे कार्यकर्त्यांना आदेश दिल्यावर मूळ भाजपवासीयांच्या चिंता मात्र वाढल्या. दुसरीकडे काँग्रेसनं बावनकुळेंचा हा वार असा काही पलटवून लावला की बावनकुळेंनाच आपल्या वक्तव्याची सारवासारव करावी लागली.