महायुतीमधली हीच खतखत, हाच विसंवाद आता रोजची बाब बनतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सरकार मधल्या या तीनही पक्षांमध्ये सुसंवाद आहे याचं एक उदाहरण सापडत नाही. पवारांच्या कार्यक्रमाला शिंदे जात नाहीत, शिंदेंच्या कार्यक्रमाला पवार जात नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या कार्यक्रमांना तिथल्या आमदारांना बोलावलं जात नाही. एका पक्षातले पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षाची डोकेदुखी ठरतायेत. या ना त्या कारणानं या तीनही पक्षांमध्ये काही ना काही कुरबुरी रोजच्या सुरु आहेत.