कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार घडलाय. पाच तास एम्ब्युलन्स न मिळाल्याने एका महिलेचा हॉस्पिटल च्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झाला. सविता विरादर असं मृत महिलेचं नाव असून तिच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.