नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा असं पत्र भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांना देण्यात आलंय. परवानगी नसताना मंदिर प्रशासनात मंदिर परिसरात लाडू प्रसाद हा वाटप सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या. त्याचबरोबर संरक्षित स्मारक घोषित असताना देखील विश्वस्त मंडळाकडून व्यवसाय सुरु असल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला.