देशाच्या इतिहासातल्या काही घटना अशा असतात ज्या कधीही न विसरता येण्यासारख्या असतात. एकोणीसशे चौऱ्याऐंशीच वर्ष हे भारताच्या इतिहासातलं प्रचंड वादळी वर्ष. याच वर्षी पंजाबमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराला जबाबदार जर्नल सिंग भिंद्रनवालेवर कारवाई करण्यासाठी भारतीय फौजा पंजाबच्या सुवर्ण मंदिरात घुसल्या. या कारवाई नंतर तीन महिन्यांमध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये दंगली उसळल्या. पण चाळीस वर्षानंतर हे सगळं पुन्हा सांगण्याचं औचित्य काय? त्याचं उत्तर आहे राहुल गांधी, राहुल गांधी यांनी परदेशी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी बोलताना दिलेल्या एका उत्तरामध्ये पंजाब मधल्या त्या घटनांविषयी माफी मागितली आणि नवा वाद सुरू झाला. पाहूयात त्याच संदर्भातला रिपोर्ट