भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेलं 'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६'चं तिसरं पर्व उत्साहात पार पडलं. कल्याण डोंबिवली रनर्स आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात आरोग्य, मैत्री आणि सांस्कृतिक एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील 9 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांतून धावपटू या स्पर्धेसाठी आले होते. 21.1 किलोमीटर हाफ मॅरेथॉनसह विविध गटांमध्ये स्पर्धा पार पडली. 21 किलोमीटरमध्ये 1 तास 11 मिनिटे तर 10 किलोमीटरमध्ये 32 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवण्यात आली.. रविंद्र चव्हाण यांनीही सहभागी होत धावपटूंचा उत्साह वाढवला...