चेन्नईमध्ये स्टॅलिन यांनी भेट घेतल्यावर सोनिया गांधी पुन्हा दिल्लीत परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्टॅलिनची भेट घेतल्यावर सोनिया गांधी मुंबईत शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र त्या दौऱ्यात बदल झाला असून त्या शरद पवारांना भेटणार नसल्याची माहिती आहे. दरम्यान सोनिया गांधी स्टॅलिन यांची भेट घेणार मात्र शरद पवारांना भेटणार नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात.