सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देशातील लाखो महिलांच्या आणि गृहिणींच्या बहुमूल्य कामाची अत्यंत ऐतिहासिक दखल घेतली आहे. एका मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणात महत्त्वाचा निर्णय सुनावताना, "महिलांना केवळ 'गृहिणी' (Homemaker) म्हणण्याऐवजी 'राष्ट्रनिर्मात्या' (Nation Builder) म्हणा," असे न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, गृहिणीचा अपघाती मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या भरपाईमध्ये त्यांच्या घरकामाची किंमत प्रतिमहा किमान ३० हजार रुपये गृहीत धरून अतिरिक्त भरपाई द्यावी, असा क्रांतिकारी निर्णय न्यायालयाने दिला आहे. महिला सन्मान वाढवणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल नेमका काय आहे? सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट नक्की पहा