पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मात्र, या आंदोलनावरून पक्षात विसंवाद असल्याचे चित्र समोर येत आहे.