मुंबईतील बीकेसीमध्ये देशातील सर्व आर्थिक अस्थापनांची कार्यलयं आहेत.. पण बीकेसी इथल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा चर्चेत असतं.. या भागात प्रदूषणाचा प्रश्न सुद्धा मोठा आहे.. यावर तोडगा काढण्यासाठी एमएणआरडीए सह विविध यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.. इथली कोंडी आणि प्रदूषण टाळण्यासाठी शुक्रवारी बीकेसीमध्ये येणाऱ्यांनी फक्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.. अर्थात या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं असलं तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्याची स्थानिक प्रवाश्यांची अपेक्षा आहे...