मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण वर्गांना सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.परिवहन विभागाच्या पुढाकारातून आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवले जात आहेत. ताडदेव, वडाळा आरटीओ कार्यालय, मुंबई मराठी साहित्य संघ इमारत, घाटकोपर, चेंबूर आणि गोवंडी अशा विविध ठिकाणी हे वर्ग सध्या सुरू आहेत.