कुठे पाऊस तर कुठे वादळी वारा अशा स्वरूपाचं वातावरण हे बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय. कारण अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातन एक एक मे ते चौदा मे पर्यंत राज्यातील एकवीस जिल्ह्यात बावीस हजार दोनशे तेहतीस हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. कांदा, आंबा, भात, बाजरी, मका, डाळिंब, संत्री यासह भाजीपाला आणि फळबागांना पावसाचा मोठा फटका बसलाय. एकट्या नाशिक जिल्ह्यातच, एक हजार सातशे चौतीस हेक्टर वरची पिकं बाधित झाली आहेत. सलग आठ दिवस इथे पाऊस पडतोय. नाशिकच्या किरनारे परिसरामध्ये भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.