Maharashtra Drought| दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण साधेपणामुळे करा, Eknath Shinde यांचं आवाहन

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. नवरात्रोत्सवासह येणारे सर्व धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरे करावेत, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. उत्सवांवरील खर्च वाचवून तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी द्यावा, असंही त्यांनी आवाहन केलं. राज्यातील बळीराजा संकटात असताना त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी असल्याचं शिंदे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. Maharashtra Drought | Eknath Shinde appeals to people to celebrate upcoming festivals with simplicity due to the drought situation.

संबंधित व्हिडीओ