मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा या शासकीय बंगल्यावरच्या कथित काळ्या जादूच्या आरोप प्रत्यारोपानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी आज आणखी एक आरोप केलाय.'वर्षावरील लॉनवर कामाख्या देवीला दिलेल्या रेड्याची शिंगं पुरल्याची चर्चा आहे,असा दावा संजय राऊतांनी केलाय.त्यावरून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राऊतांना जोरदार उत्तर दिलंय.राज्यात नवं सरकार स्थापन होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेलाय.पण राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना राज्याने दिलेल्या घरात म्हणजे वर्षा बंगल्यात रहायला गेलेले नाहीत,या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना टोले लगावलेत.