मंत्र्यांच्या खासगी सचिव नियुक्तीवरुन शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिल्याची सूत्रांनी माहिती दिली.ज्या खाजगी सचिवांच्या नावाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येतेय.शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांच्या स्वयंघोषित खाजगी सचिव विशाल राठोड यांनाही ग्रामविकास या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिले गेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.विशाल राठोड यांनी परस्पर खाजगी सचिव पत्र स्वाक्षरी केल्या अशी बातमी एनडीटीव्ही मराठीनं काही दिवसांपूर्वी दाखवली होती. त्यावरुन मुख्यमंत्री कार्यालयात नाराजी देखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.